महाराष्ट्र

घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी

घर भाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन

मुंबई, दि. 17 : देशात कोवीड-१९ या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर ३ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जारी राहणार आहे. या परिस्थितीत सर्व व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने रोजगारावर परिणाम झाला आहे. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी अशा सूचना राज्यातील सर्व घरमालकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

लॉकडाऊन परिस्थितीमुळे सर्व बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारवरही परिणाम झालेला असून, अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. यामुळे अनेकांना अत्यंत कठीण अशा आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना नियमित भाडे भरणे शक्य होत नसून, भाडे थकत असल्याची वस्तुस्थिती आहे.

या परिस्थितीत घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रकमांची अदायगी न झाल्याने किंवा भाडे थकल्याने कोणत्याही भाडेकरूंना भाड्याच्या घरांमधून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व संबंधित घरमालकांना गृहनिर्माण विभागाने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत, अशी माहितीही मंत्री श्री.आव्हाड यांनी दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!