ठाणे

बिना मास्क फिरणाऱ्या लोकांवर प्रशासनाच्या वतीने दंडनीय शुल्क लावण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी

ठाणे   : कोविड 19 या जागतिक महामारी युद्धात ठाणे महापालिका अतिशय उत्तम कार्य करीत आहेत.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रशासकीय व पोलीस प्रशासनाचे काम रित्या सुरु आहे परंतु काही उपद्रवी नागरिकांच्या मुळे या प्रशासकीय सेवेचा बोजवारा उडवला जात आहे व त्यामुळे या रोगाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

अनावश्यक कारणाकरिता फिरणाऱ्या लोकांमध्ये अजूनही याबाबतीत धसका नसल्यामुळे ते मोकाट फिरत आहेत त्याचप्रमाणे असंख्य असे नागरिक व असंख्य दुकानदार जीवनावश्यक वस्तूंची विक्री करत आहेत ती लोकं हॅन्ड ग्लोज व मास्क न घालता विक्री करत आहे त्यामुळे हजारो लोक आपण कितीही उपाययोजना केलेल्या आहेत तरी देखील त्याला हरताळ फासण्याचे काम करीत आहेत.

त्यामुळे अशा लोकांवर दंडनीय शुल्काची आकारणी करण्यात यावी जी बृहन्मुंबई महानगरपालिका व सांगली महानगरपालिका यांनी राबवलेली आहे त्यामुळे या बाबतीत आपण पण स्वतः व वैद्यकीय अधिकारी व इतर जबाबदार अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन याबाबतीत आदेश पारित करण्यात यावा जेणेकरून नागरिकांमध्ये याची दखल घेतली जाईल व आवश्यक संरक्षण घेऊनच नागरिक घराबाहेर पडतील व यारोगाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग निहाय त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी मराठी एकीकरण समितीने महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे .

तसेच साखळी ग्रामपंचायत ने बुलडाणा येथे याबाबत ५०० रुपये दंड वसूल करणे सुरू केले आहे. तसेच सांगली महानगरपालिकाने ३६७ बिना मास्क लोकांवर कारवाई केली आहे. जवळपास १.२५ लाख वसुली करण्यात आली आहे, या अश्या कारवाईमुळे प्रशासकीय महसुलात देखील वाढ होईल व सदर निधी कोविड सहायतासाठी वापरण्यात मदत होईल. असेही पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!