डोंबिवली ( शंकर जाधव ) : करोनामुळे संचारबंदी असल्याने सर्व शहर कुलुप बंद झाले आहे.यामुळे संचारबंदीच्या काळात गरीबांच्या उपजिविकेची समस्या उभी राहिली. या कठीण काळात डोंबिवली फिडींग इंडियाच्या वतीने डोंबिवलीतील गरजुंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.फिडींग इंडियाच्या दिल्ली शाखेच्या वतीने सुमारे १० टन अन्नधान्य डोंबिवलीतील फिडींग इंडियाच्या शाखेत पाठविण्यात आले होते.भारतात फिडींग इ़डियाची २०१४ साली स्थापना करण्यात आली.डोंबिवलीत २०१७ साली फिडींग इंडियाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी फिडींग इंडिया देशभर काम करते. या कार्यासाठी भारतभर कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्यात आले आहे.भारतातील विविध धार्मिक-.सांस्कृतिक कार्यक्रमातून अन्न गोळा करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाते.करोनाचा उद्रेक पाहता, फिडींग इंडियाच्या वतीने डोंबिवतील सर्वेक्षणा नुसार गरजूंना व्यक्तींंना तांदूळ आणि तूर, मसूर, चना डाळीचे वाटप करण्यात आले.डोंबिवलीतील ५०० कुटुंबांंनी याचा लाभ घेतला.नेहाल थोरावडे, शुभम शेट्ये, मनोज पुरोहित, करोनाचे सोशल डिस्टसिंगचे नियम अनुसरुन डोंबिवलीत विविध ठिकाणी अन्नधान्याचे वाटप केले.
डोंबिवलीत फिडींग इंडियाच्या वतीने अन्नधान्याचे वाटप
12 months ago
143 Views
1 Min Read

-
Share This!