डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाँऊनमुळे रिक्षा बंद असल्याने रिक्षा चालक आर्थिक संकटात सापडले आहेत . साठवून ठेवलेली तुटपुंजी रक्कमही महिनाभरात संपली आणि घरातील किराणामालही संपल्याने आता पोटाची भूक कशी भागविनार असा प्रश्न रिक्षा चालकांच्या होता.रिक्षाचालकांच्या मदतीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार आहे. आज शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वळेकर , शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे नितीन नांदगावकर, रिक्षा संघटनेचे प्रमुख प्रकाश पेणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रिक्षा चालकांना धान्य पॅकेट वाटप करून आज या महायज्ञाला सुरुवात करण्यात आली. आजपासून पुढील सलग १० वस शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व , मुंब्रा – कळवा, डोंबिवली पूर्व या सर्व 6 विधानसभा क्षेत्रात 55 हजार रिक्षाचालकांना धान्य पॅकेट दिले जाणार आहेत . सोबतच कल्याण पश्चिम, बदलापूर टिटवाळा आदि भागांतील रिक्षा चालकांना देखील याचे वाटप केले जाणार आहे.
पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली महिनाभरापासून कल्याण लोकसभा मतदारसंघात कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज 50 हजार गरजू नागरिकांना फूड पॅकेट देखील पोहोचवत असल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली. या संकटाच्या काळात अविरत आणि अविश्रांत मेहनत घेणाऱ्या सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कौतुक केले. कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकल्यानंतर आरोग्यसेवा, अन्नदान सेवा, सफाई कर्मचारी सेवेत फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या सर्वांचा विशेष सन्मान केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.