ठाणे

आदिवासी, गोरगरीब नागरिकांना व उत्तर भारतीय कामगारांना मोफत अन्नदान (जेवणाचे) वाटप

फोटो ओळी :- पहिल्या छायाचित्रात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जेवणाचे वाटप करताना, तर दुसऱ्या छायाचित्रात अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख जेवणाचे वाटप करताना. सोबत अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, आमाचे अध्यक्ष उमेश तायडे, नगरसेवक सचिन पाटील आदी दिसत आहेत. (छाया :- नवाज वणू)
नगरसेवक सचिन पाटील यांच्याकडून लॉकडाऊन संपेपर्यंत अन्नदानाचे वाटप
 
अंबरनाथ दि. ०६ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून संपुर्ण देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील वॉर्ड क्र. ५७ मधील आदिवासी, गोरगरीब नागरिक आणि उत्तर भारतीय कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता येथील स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यापासून अंबरनाथ पूर्वेकडील सचिन हॉटेल, आनंदनगर, एमआयडीसी याठिकाणी दररोज मोफत अन्नदान (जेवणाचे) वाटप करण्यात येत असून दररोज सुमारे १२०० ते १३०० नागरिकांना व कामगारांना मोफत अन्नदान (जेवणाचे) वाटप करण्यात येत आल्याची माहिती सचिन पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या अन्नदान वाटपाकरिता “आमा” चे अध्यक्ष उमेश तायडे यांचे मोलाचं सहकार्य लाभलं असून जांभिवली गांव, जांभिवली पाडा, फणसीपाडा, ठाकूरपाडा येथील ग्रामस्थांचे ही सहकार्य लाभत असून “जोपर्यंत लॉकडाऊन सुरू राहील, तोपर्यंत मोफत अन्नदान (जेवणाचे) वाटप” करण्यात येणार असल्याचे ही पाटील यांनी सांगितले. तसेच याअगोदर सुमारे ३ हजारांपेक्षा जास्त गोरगरीब नागरिक व नाका कामगारांना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात धान्याचे वाटप करण्यात आले होते.
            याप्रसंगी अंबरनाथ तहसीलदार जयराज देशमुख, अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, ‘आमा’चे अध्यक्ष उमेश तायडे, व्हर्टिव कंपनीचे मॅनेजर मंगेश सावंत यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

Advertisements

मुंबई

कोकण

error: Content is protected !!