ठाणे

आरोग्य तपासणी सर्टिफिकेटसाठी  ३०० रुपये आकारत असल्याचा आरोप करत मनसेचा विचारला जाब.. आयुक्तांनी घेतली दाखल.. 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी त्यांच्या  आरोग्य तपासणी सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे. त्यासाठी लोकांनी ज्या ठिकाणी  सर्टिफिकेट मिळत  आहे., त्यासाठी तोबा गर्दी  करताना दिसतात. डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात  आरोग्य तपासणी सर्टिफिकेट प्रती व्यक्ती ३०० रुपये आकारत असल्याचा आरोप  नंदकिशोर भोसले,महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष(जूनी डोंबिवली) नंदकिशोर भोसले आणि मनसैनिक सुनील जकाते यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क  केला.  आयुक्त डॉ. सूर्यवंशी  यांनी याची दाखल घेत  संबंधित रुग्णालयाला   ३०० रुपये शुल्क घेणे बंद करण्यास सांगत
 कागदपत्रासाठी लागणारे शुल्क आकारा असे निर्देश दिले. त्यानंतर सदर रुग्णालयाने आयुक्तांच्या निर्देशाचे फक्त आवश्यक कागदपत्रांसाठी प्रती व्यक्ती ३० रुपये आकरले, अशी  माहिती  भोसले यांनी दिली.
     सरकारी आदेशानुसार  ज्या लोकांना आपल्या राज्यात तसेच आपल्या गावी जायचे आहे. त्या लोकांना आरोग्य तपासणी(medical) सर्टिफिकेट बंधनकारक केलेले आहे. हे सर्टिफिकेट व तपासणी करून घेण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका रुग्णालयात आणि कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी काही खाजगी रुग्णालयांना तपासणी करून सर्टिफिकेट देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी अनेक लोक परवानगी असलेल्या  खाजगी रुग्णालयात गेले असता त्यांची तपासणी करून त्यांच्याक्डून  प्रति व्यक्ती ३०० रूपये दर आकारणी केली जात होती असा आरोप  शाखा अध्यक्ष(जूनी डोंबिवली) नंदकिशोर भोसले आणि मनसैनिक सुनील जकाते यांनी केला आहे. भोसले यांनी तात्काळ त्या रुग्णालयात जाऊन  शहानिशा केली केली. पालिका  आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  ह्यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराबाबत माहिती दिली. पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संबधित रुग्णालयाशी  संपर्क साधून  रुग्णालयाने ३०० रुपये शुल्क घेणे बंद करण्यास सांगितले, तर
 आवश्यक कागदपत्रासाठी लागणारे शुल्क आकारण्यात यावे असे निर्देश दिले.  मनसेच्या पाठपुराव्याने  गरीब जनतेला   न्याय मिळाल्याबद्दल नागरिक जनतेचे आभार मानत  आहेत

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!