डोंबिवली ( शंकर जाधव ) : पुढच्या महिन्यापासून पावसाला सुरु होणार असल्याने केडीएमसी हद्दीतील नालेसफाई व रस्त्यावरील खड्डे बुजवा अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते तथा मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांची मागणी यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नालेसफाई न झाल्यास पावसाळ्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच नागरिकांना साथीचे रोग होण्याची शक्यता आहे. आदीच कोरीना व्हायरस मुळे आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करत असताना पावसाळ्यात त्यांच्यावर कामाचा अधिकच ताण पडेल. पालिका प्रशासनाने वेळचे गांभीर्य लक्षात घेऊन नालेसफाई व रस्त्यावरील खड्डे बुजवने आवश्यक आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमी नागरिकांना सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून पालिकेकडे पाठपुरावा करत असतो.त्यामुळे माझ्या या मागणीकडे लक्ष द्यावे असे मनसे जिल्हाध्यक्ष भोईर यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी केडीएमसी हद्दीतील नालेसफाई व रस्त्यावरील खड्डे बुजवा… मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांची मागणी
12 months ago
16 Views
1 Min Read

-
Share This!