ठाणे

भाजपच्या वतीने डोंबिवलीतील पोलिसांना पीपीई  किट्सचे वाटप 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना महामारीच्या विरोधात फ्रंट लाईनवर आरोग्यसेवकांइतकेच पोलीसहि लढा देत आहेत. हॉस्पिटल्स, शासकीय कार्यालयं , महापालिका, रस्ते वाहतूक, रेड झोन, कंटेनमेंट झोन सर्व ठिकाणी संरक्षण करताना पोलिसांनाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार डोंबिवली  ग्रामीण उद्योजक मंडळ सेलचा संयोजक सुरेश सोनी  आणि  भाजपा डोंबिवली पूर्व अध्यक्ष नंदू जोशी यांनी  डोंबिवली शहरातील रामनगर, विष्णूनगर, मानपाडा, टिळकनगर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाला पीपीई किट्स दिले.सहाय्यक पोलीस आयुक्त  दिलीप राऊत , मानपाडा पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे, टिळकनगर पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय धुरी, विष्णूनगर पोलीस ठाण्याचे   वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुणगेकर, रामनगर पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांना पीपीई  किट्स देताना सोनी आणि जोशी यांनी सर्व पोलीस बंधावानी आपले कर्तत्व बजावीत असताना आरोग्याची काळजी घ्यावी अशी विनंती केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!