डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील आजदेगाव आणि आजदेपाडा येथील विद्यार्थ्यांसाठी श्री साई गणेश मित्र मंडळाने आजदेगावच्या वतीने इयत्ता १ ली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोरीना जनजागृती भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.
मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विनोद काळण यांनी लॉकडाऊन काळात अश्या प्रकारची स्पर्धा आयोजीत केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले .या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वरुपा पाताडे या विद्यार्थिनीने पटकाविला. तर दुसरा क्रमांक श्रेया खामकर आणि तिसरा क्रमांक दीपिका चैलंगी या विद्यार्थिनीना मिळाला. या स्पर्धेत १३५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत कोरोना जनजागृती संदर्भात आपणास ज्ञात असलेले चित्र, मेहनत घेत असलेली सरकारी यंत्रणा आणि निसर्ग असे तीन विषय ठेवण्यात आले होते.पप्रथम क्रमांक पटकाविणाऱ् या विजयी स्पर्धकास ३, ३३३ रुपये, दुसरा क्रमांक येणाऱ्या स्पर्धकास २,२२२ आणि तिसऱ्या विजयी स्पर्धकास १,१११ अशी रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम गुगल पे ने पाठविण्यात येणार आहे.