ठाणे

दिव्यात शीळ रोड येथे मुंबई व नवी मुंबईकडे जाणाऱ्याची  रोज थर्मल गनद्वारे तपासणी

 ठाणे :  ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती येथून मुंबई व नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या सर्वांची नॅशनल स्कुल, पोलीस चेक नाका, दिवा शीळ रोड येथे रोज थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशान्वये ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
  दिवा येथून मुंबई व नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी टिएमटी, खाजगी बस, कार, रिक्षाने जाणा-या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. दररोज येजा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांची नॅशनल स्कूल, पोलीस चेक नाका, दिवा शीळ रोड येथे रोज थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. तसेच त्यांची संपूर्ण माहिती नोंदवहीत घेण्यात येत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!