ठाणे

  केडीएमसीने कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकाराने हे अत्यंत चुकीचे.

माजी  आमदार नरेद्र पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र..  

डोंबिवली  ( शंकर जाधव ) :   कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या दिवसेंदिवस वाढत असताना पालिका प्रशासनाने रुग्णांच्या उपचाराच्या खर्चाचा दर  ठरविला आहे. यावर नागरिकांनी पालिकेच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. तर जनतेच्या या प्रश्नावर विरोधी बाकावरील भाजपने आवाज उठविला आहेपालिकेच्या या अन्यायकारक भूमिकेबाबत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. राज्य शासनाने राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत उपचार देण्याचे जाहीर केलेले असतांना महानगरपालिकेमार्फत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकाराने हे अत्यंत चुकीचे आहे असे पत्रात म्हटले आहे.

माजी आमदार पवार यांनी पत्रात म्हणले आहे, सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना आता बिल का आकारले जात आहे? राज्य शासनाने राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत उपचार देण्याचे जाहीर केलेले असतांना महानगरपालिकेमार्फत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकाराने हे अत्यंत चुकीचे असून लॉकडाऊन काळात अनेकांवर आर्थिक संकट कोसळले असुन अश्या काळात नागरिकांत संभ्रम आणि नाराजी आहे.केंद्र व राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कोरोना योद्धे पुढे येऊन अत्यावश्यक सेवेत सहाभागी झाले आहेत, दुर्दैवाने त्यातील काहींना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांनाही उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे, याशिवाय अनेक पोलीस व इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींनाही हा निर्णय जाचक ठरत आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेसाठी मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय १ मे महाराष्ट्र दिनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश  टोपे  यांनी जाहिर केला आहे. असे असतांना कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने एक परिपत्रक काढून कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे सर्व सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे  त्वरित आपण लक्ष घालून कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांवर मोफत उपचार करण्याबाबत कल्याण – डोंबिवली महानगरपालिका प्रशासनास आदेश द्यावे अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!