ठाणे

डोंबिवलीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला रुग्नावाहीका मिळेना..

भरउन्हात  पायी चालतच पालिकेच्या रुग्णालयात जावे लागले..

 डोंबिवली ( शंकर जाधव ) :  डोंबिवली पश्चिमेकडील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला पालिकेने रूग्णावाहिका उपलब्ध करून न दिल्याने त्याला भरउन्हात पायी चालत पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय जावे लागले. त्याचा हा त्रास इथेच संपला नव्हता.या रूग्णालयात रुग्णाची संख्या वाढल्याने दुसऱ्या खाजगी रुग्णालयात जावे लागेल मात्र रुग्णवाहिका अजूनही उपलब्ध नसल्याने या रुग्णाला तब्बल तीन तास पालिकेच्या रुग्णालयात रुग्णवाहिकेची वाट पाहत थांबावे लागले.

डोंबिवली पश्चिमेकडील एका तरुण मुलाची कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला पालिका प्रशासने शास्त्रीनगर रुग्णालयात जाण्यास सांगितले.परंतु प्रशासने या रुग्णाला रूग्णालयापर्यत जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नसल्याने त्याला नाईलाजाने भरउन्हात पायी चालत जावे लागले. या रुग्णाला कोणतीही अडचण येऊ नये, रस्त्यात कडक उन्हामुळे चक्कर येऊ नये म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्यापासून काही नंतर लांब चालत शिवसैनिक गोरखनाथ ( बाळा) म्हात्रे, संदीप सामंत, मनोज वैद्य आणि अॅड. गणेश पाटील यांनी त्याला शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. मात्र तिथेही त्याला त्या रुग्णाला माहिती  दिल्यावर रूग्णालयातील डॉक्टरांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही अशी तक्रार रुग्ण आणि त्याच्या बरोबर आलेल्या शिवसैनिकांनी केली.याबाबत रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.तर रुग्णालयातील एका परिचारिकेशी याबाबत माहिती घेण्यास संपर्क केला असता त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असल्याने त्याला रुग्णालयात आणण्यासाठी रुग्णवाहिका जात असतात.रुग्णाला याबाबत विचारले असता ते म्हणाले, कोन गावातील एका रूग्णालया जाण्यासाठी रुग्णवाहिका येण्यास तब्बल तीन तास लागले. त्यामुळे मला शास्त्रीनगर रुग्णालयात बसावे लागले

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!