ठाणे, ( 5 जून, संतोष पडवळ) : वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. त्या चौथ्या स्तंभाचा शेवट भाग तर म्हणून वृत्तपत्र विक्रेता हा काम करत असतो. ऊन पाऊस वारा वादळ काही असो तो दररोज आपल्याला वृत्तपत्र घरपोच देत असतो. संपूर्ण जगावर जे कोरोना संकट आले आहे त्यामुळे २२ मार्च पासून घरोघरी वृत्तपत्रं वितरण बंद आहे.आणि या वृत्तपत्र विक्रेत्यांची रोजीरोटी पूर्णपणे बंद आहे.या विक्रेत्यांचे ग्राहकांकडे असलेले पेपर बिल सुद्धा त्यांना घेता न आल्याने या सर्व विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत सेवा सहयोग फाउंडेशन यांच्यावतीने ठाण्यातील गरजू ५५ वृत्तपत्र विक्रेत्यांना १५ किलो अन्नधान्य देण्यात आले. सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून व ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन यांच्या सहकार्याने भर पावसात ५५ वृत्तपत्र विक्रेत्यांना अन्नधान्य वाटप केल्यामुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी व संघटनेने या सेवा सहयोग फाउंडेशन चे संस्थापक श्री किशोर मोघे, श्री संजय हेगडे यांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर रिक्षा चालक, बिगारी कामगार, रंग मंच कामगार,शिलाईकाम करणाऱ्या महिला मिळून 166 किट वाटप केलेया प्रसंगी सेवा सहयोग च्या कार्यकर्त्या अंजली गांगल, आरती नेमाणे , संघटनेचे अध्यक्ष दत्ता घाडगे व विवेक इसामे, वैभव म्हात्रे, गणेश शेडगे व इतर सहकारी उपस्थित होते.
भर पावसात वृत्तपत्र विक्रेत्यांना सेवा सहयोग फाउंडेशन केले धान्यवाटप
11 months ago
42 Views
1 Min Read

-
Share This!