ठाणे

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

ठाणे दि. १८ :  ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पाच पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज एन.के. टी. सभागृह,  ठाणे येथे जाहीर करण्यात आली.

        यावेळी उप जिल्हाधिकारी ( प्रशासन) अभिजीत भांडे पाटील यांनी उपस्थितांना आरक्षण सोडत प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी तहसीलदार ( सर्वसामान्य) राजाराम तवटे,  राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मा. विधानसभा सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. ही प्रक्रिया कोव्हिड-१९ बाबत शासन निर्देशांचा अवलंब करून मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आली होती.

सदर आरक्षण खालील प्रमाणे

१)    अध्यक्ष जिल्हा परिषद, ठाणे

   नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ( महिला)

२)       पंचायत समिती, शहापुर

       अनुसूचित जमाती ( महिला )

३)    पंचायत समिती, अंबरनाथ

       अनुसूचित जमाती ( महिला )

४)     पंचायत समिती, मुरबाड

          नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

५)    पंचायत समिती,कल्याण

           सर्वसाधारण (महिला)

६)      पंचायत समिती, भिवंडी

             सर्वसाधारण

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!