ठाणे

योग्य वीज बिले आकारा अन्यथा आंदोलन करू.. रिपब्लिकन सेनेचा इशारा      

डोंबिवली ( शंकर जाधव ) : रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष-सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशान्वये लॉकडाऊनच्या काळात राज्यात बौद्ध ,दलित,पारधी,अल्पसंख्यांक या बांधवांवर होणाऱ्या  हल्ल्याच्या निषेधार्थ व पीडितांना योग्य न्याय मिळावा यासाठी  डोंबिवली शहर कमिटीच्या वतीने कल्याण तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे लॉक डाऊन काळात मार्च ते जून या महिन्यात महावितरण कंपनीने देण्यात येणारे वाढीव वीज बिल देयक बिले जनहितार्थ संपूर्ण माफ करण्यात यावीत याकरिता महावितरण कंपनीने चे कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा निमंत्रक कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पँथर आनंद नवसागरे, युवा नेते,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आयु.राहुल जाधव, २७ गावे विभाग अध्यक्ष ग्रामीण आयु.अनंत पारदुले,ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष आयु.थॉमस शिनगारे,कायदेशीर सल्लागार रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा ऍड.महेंद्र निकम, राजेंद्र पाटोळे,आनंद गांगुर्डे, एड.खरात,(जिल्हा सदस्य)आदी उपस्थित होते.मागण्या पूर्ण न झाल्यास प्रशासनाला आंदोलनाचा जाहीर इशारा देण्यात आला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!