गुन्हे वृत्त

  डोंबिवलीत अल्पवयीन बालिकेचा विवाह… अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सजगतेमुळे नवरदेव गजाआड…

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३३ जून रोजी दुपारी १ वाजता १५ वर्षांची बालिकावधू व २७ वर्षांचा तरुण यांचा विवाह गुपचूप संपन्न झाला.मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सजगतेमुळे नवरदेव तसेच दोघांच्या नातेवाईकांना  मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.  डोंबिवलीतील मानपाडा भागातील सोसायटीमधील अतिशय गुप्तपणे एका घरात पार पडलेल्या बाल विवाहातील अल्पवयीन मुलीचे वय मात्र १५ वर्ष, ३ महिने, ११ दिवस आहे. तर नवरदेव २७ वर्षांचा आहे, असे महा अंनिस कायदा व्यवस्थापन विभागाच्या राज्य सहकार्यवाह ऍड तृप्ती पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  बुवाबाजी विरोधी संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह ऍड रंजना गवांदे (संगमनेर) ह्यांना आलेल्या निनावी फोनद्वारे मिळालेल्या माहीतीनुसार महा अंनिस कायदा व्यवस्थापन विभागाच्या राज्य सहकार्यवाह ऍड तृप्ती पाटील (डोंबिवली) ह्यांना दिनांक ३० जून रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान फोन झाला.  त्यांनी डोंबिबलीच्या मानपाडा भागातील एका सोसायटीच्या घरात बालविवाह होणार असल्याबद्दल तक्रारीची माहिती सांगितली. मुलगी ही अल्पवयीन असुन अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे असे समजले.  ऍड तृप्ती पाटील ह्यांनी ताबडतोब मानपाडा पोलीस स्टेशनला कळवले आणि त्यांनी लगेचच बीट मार्शल आपल्या हद्दीत शहानिशा करण्यास पाठवले, परंतु काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे स्वत: ऍड तृप्ती पाटील, महा अंनिस ठाणे जिल्हा  प्रा प्रवीण देशमुख ह्यांच्यासह मानपाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शोध घेतला  असता अपेक्षित असलेले ठिकाण सापडले.  बाल विवाह आज दुपारी संपन्न झाला  अशी माहिती मिळाली ऍड तृप्ती पाटील म्हणाल्या, कार्यकर्त्यांकडे संपूर्ण पत्ता व इतर माहिती नसल्यामुळे बालविवाह होताना तो थांबवु शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे वेळ खूप कमी होता. परंतु त्या दरम्यान पोलिसांना सोबत घेऊन बालविवाह पार पाडण्यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडण्यात यश मिळाले. त्यानंतर सर्वांना मानपाडा पोलीस स्टेशनला नेण्यात आले असुन नवरदेव, नवरी आणि नवरदेवाकडील नातेवाईकांवर बाल विवाह प्रतिबंध कायदा, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश आंधळं ,साहेबराव जाधव ,शोभा जाधव यांचेसह ७ जणांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!