मुंबई

प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षिका सरोज खान यांचं वृद्धापकाळाने निधन;

मुंबई,(दि.3 जुलै 2020): सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या, त्यांचे निधन कार्डिअॅक अरेस्टमुळे झाले. 17 जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही दिवसांपूर्वी त्यांना श्नसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना वांद्र्यातील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याव्यतिरिक्त त्यांना मधुमेह आणि याच्यासंबंधित आजारांशीही त्या झुंज देत होत्या. दरम्यान, त्यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची करोना चाचणीही करण्यात आली होती. परंतु चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

गेल्या बऱ्याच काळापासून त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु 2019 मध्ये मल्टिस्टार चित्रपट कलंक आणि कंगना रणोतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एक गाण त्यांनी कोरिओग्राफ केल होतं. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शनही त्यांनीच केलं होतं. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचेही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं होत.

मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलंल आहे.

सरोज खान यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. 1974 मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत 2 हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. तसेच सरोज खान यांना आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. काही चित्रपटांमध्ये त्यांनी लेखक म्हणूनही काम केले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!