गुन्हे वृत्त

मुंब्रा , दिवा येथील घरफोडी तसेच जबरी चोरी करणार्‍या आरोपींना मुंब्रा पोलीसांनी केले गजाआड

सुमारे 13.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने 13 मोबाईल्स व इतर वस्तू असा एकूण 6 लाख 69 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

मुंब्रा : दिनांक 28 जून 2020 रोजी फिर्यादी नसरीन मोहम्मद शकील शेख (वय 30 वर्षे), धंदा गृहिणी, रा. रुम नं. 101, अफरोज मंझिल, पहिला माळा, तलावपाळी रोड, कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, दिनांक 15 जून 2020 रोजी सायंकाळी 7 वाजता ते दिनांक 28 जून 2020 रोजी सकाळी 6.30 या सुमारास रुम नं. 101, अफरोज मंझिल, पहिला माळा, तलावपाळी रोड, कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे या ठिकाणी फिर्यादी हे त्यांच्या घरास कुलूप लावून त्यांचे सासरे यांच्या घरी भिवंडी या ठिकाणी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून त्यावाटे आत प्रवेश करुन 7 लाख 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, एलईडी टीव्ही, कम्बल, कुकर, इस्त्री इत्यादी घरगुती वस्तू असा माल चोरी करुन नेण्याबाबत फिर्याद दिल्यावरुन मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 561/2017 भादवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .

प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मंगेश बोरसे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचारी यांनी त्यांच्या गुप्त बातमादाराकडून माहिती काढून सदर गुन्हा करणारा आरोपी नामे सरफराज हुसेन सलीम खान (वय 25 वर्षे), रा. रुम नं. 502, पाचवा माळा, ए विंग, एहमद मेन्शन, कौसा गाव, कौसा, मुंब्रा, ता.जि. ठाणे यास दिनांक 4 जुलै 2020 रोजी अटक करुन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी एकूण रु. 4 लाख 54 हजार 500 रुपचे किमतीचे दागिने, चांदीच्या वस्तू, एलईडी टीव्ही, इस्त्री, कम्बल व इतर संसार उपयोगी वस्तू हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे हे करीत आहेत.

तसेच मुंब्रा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 610/2020 भादवि कलम 392, 34 मधील फिर्यादी नामे विजय रामदमव मंडल (वय 21 वर्ष), धंदा शिक्षण, रा. आशियाना अपार्टमेंट, ए विंग, रुम नं. 301, दत्तुवाडी, मुंब्रा, ता.जि. ठाणे यांनी दिले. फिर्यादी वरुन मुंब्रा पोलीस ठाण्यात वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नमुद गुन्ह्यातील अटक आरोपीत नामे अरबाज फिरोज येलुकर (वय 35 वर्ष), रा. नियाज अपार्टमेंट, तळमजला, रुम नं. 01, शिवाजी नगर, अमृत नगर, मुंब्रा, ता.जि. ठाणे यास सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपास पथकातील कर्मचारी यांनी दिनांक 5 जुलै 2020 रोजी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल रु. 5 हजार 70 रुपये किमतीचा टेक्नो कंपनीचा मोबाईल, पर्स व रोख रक्क्कम 20 रुपये असा माल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नावले हे करीत आहेत.

त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार दिवा गुन्हे प्रकटीकरण सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.एच.क्षिरसागर यांनी त्यांच्याकडील तपासावर असणारा गु.रजि.नं. 493/2020 भादवि कलम 454, 457, 380च्या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण व बातमीदार यांच्या मदतीने तपास करुन गुन्ह्यातील आरोपी सुनिल पवलेस कलम (वय 20 वर्ष), रा. शांतीनगर, झोपडपट्टी, कळवा यास ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्यांपैकी पेटीपॅक 7 मोबाईल पैकी 1 लाख 11 हजार रुपये किमतीचे 6 पेटीपॅक मोबाईल व इतर 6 मोबाईल असे 2 लाख 90 हजार रुपये किमतीचे एकूण 12 मोबाईल हस्तगत करण्याात यश आले आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर, पोलीस नाईक सस्कर, पोलीस नाईक मोरे, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांच्या पथकाने केली आहे.

सदर कामगिरी पोलीस आयुक्त फणसळकर, सहपोलीस आयुक्त मेखला, अप्पर पोलीस आयुक्त कुंभारे, पश्चिम प्रादेशिक विभाग,पोलीस उपायुक्त बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त घोसाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नावले, पोलीस हवालदार दिपक जाधव, पोलीस नाईक अनिल चव्हाण, पोलीस शिपाई राकेश येशी, पोलीस शिपाई तेजस परब, पोलीस शिपाई अर्जुन जुवाटकर, पोलीस शिपाई प्रमोद जमदाडे, पोलीस शिपाई अंकुश वैद्य, नेमणूक मुंब्रा पोलीस स्टेशन, पोलीस शिपाई सचिन जाधव, नेमणूक मुख्यालय, ठाणे शहर यांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!