ठाणे

जोपर्यंत महावितरणकडून दुरुस्ती करून नवीन बिल येत नाहीत, तोपर्यंत नागरिकांनी विजे बिले भरू नयेत

भाजपा शहराध्यक्ष अभिजित करंजुले-पाटील यांचे नागरिकांना आवाहन
 
अंबरनाथ दि. ०८ (नवाज अब्दुलसत्तार वणू) कोरोनाचे संकट आपल्या देशात वाढत गेल्यामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला, त्यानुसार सर्व नागरिक घराबाहेर न पडता आपापल्या घरात सुरक्षित होते. महावितरणकडून रिडींग घेणारे कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या संकटामुळे रिडींग घ्यावयास आले नाहीत, त्यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये विजेची बिले अंदाजित स्वरूपात पाठविलेली आहेत. अंबरनाथ  शहरातील नागरिक प्रामाणिक असल्यामुळे महावितरणकडून पाठविलेली अंदाजित बिले सुद्धा ते भरत आहेत, परंतु, आता वीज कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणे वगळता प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतलेले आहे व मागील रिडींग आणि चालू रिडींग युनिट एकदम एकत्रित करून अंबरनाथ मधील नागरिकांना बिले पाठविण्यात आलेली आहेत, त्यामुळे ही तीन महिन्याची रिडींग एकत्रित होऊन नागरिकांच्या बिलात मोठ्या स्वरूपात बिलाची रक्कम आकारण्यात आलेली आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दोन-तीन महिने रिडींग न घेतल्यामुळे हा प्रकार झालेला आहे. असे भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराध्यक्ष अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले-पाटील यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश सत्यनारायण कलंत्री यांच्या निदर्शनास आणून देत आज लेखी निवेदन देण्यात आले.
             नागरिकांना टेक्निकली चुकीची बिले पाठवून जनतेला फसवून बळजबरीने बिले वसूली करण्यात येत आहेत, त्यात त्वरित सुधार करण्यात यावा. कोरोना संकटामुळे केंद्र सरकार सर्वतोपरीने मदत करत असताना महावितरणकडून युनिट रेट वाढवून, चुकीची बिले पाठवून जनतेला वेठीस धरण्यात येत आहात, आपणही ह्या कठीण समयी जनतेला त्रास न देता किमान ३०० युनिटपर्यंत प्रतिमाह वीज बिल आकारणी करू नये, एकत्रित पाठविलेल्या बिलाची युनिट कॅलक्युलेशन तीन हफ्त्यात  समानरीतीने विभागूनच नागरिकांना बिले पाठविण्यात यावीत, अशीही मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.
              जोपर्यंत वीज बिलांमध्ये दुरुस्ती करून आपण नवीन बिल पाठवत नाहीत, तोपर्यंत नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची वीजबिल वसुली करू नये अथवा वीज पुरवठा खंडित करू नये, अन्यथा भाजपातर्फे महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले-पाटील यांनी दिला आहे. याप्रसंगी भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले-पाटील,माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे,दिलीप कणसे, मनीष गुंजाळ,नितीन परब,विश्वास निंबाळकर,महेश मोरे,राहुल भोसले आदि उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!