ठाणे

ठामपा क्षेत्रातील नादुरूस्त चेंबर्स कव्हर्सची पाहणी करुन तातडीने कार्यवाही करावी – आयुक्त डॉ.विपिन शर्मा.*

ठाणे (10 जुलै, संतोष पडवळ ) :  पावसाळ्यात कोणतीही  जीवितहानी व वित्तहानी होवू नये यासाठी  शहरातील सर्व मुख्य रस्ते तसेच उपरस्त्यांच्या बाजूचे फूटपाथ व गटार यांची पाहणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. ज्या ठिकाणी  नादुरूस्त चेंबर्स कव्हर्स असतील तसेच ज्या ठिकाणी चेंबर कव्हर्स नसतील त्या ठिकाणी त्वरीत चेंबर्स कव्हर्सची दुरुस्ती किंवा नवीन कव्हर्स बसविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
          यानुसार प्रभागसमितीनिहाय चेंबर्सची झाकणे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नौपाडा –कोपरी, उथळसर, कळवा, मुंब्रा, दिवा, माजीवडा, वर्तकनगर, लोकमान्य सावरकरनगर, वागळे प्रभाग समिती याक्षेत्रात एकूण 355 चेंबर्स झाकणे बसविण्यात येणार असून एकूण 236ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित चेंबर्स झाकणे बसविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. चेंबर्सच्या झाकणांअभावी कोणताही अपघात होऊ नये व नागरिकांना त्रास होवू नये यासाठीत सर्व प्रभागसमितीमध्ये कार्यवाही सुरू असून त्याची पाहणीही संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. तसेच चेंबर्ससंदर्भात नागरिकांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्या तक्रारीचे निरसन तातडीने करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!