महाराष्ट्र

मोखाड्यातील खोडाळ्यात कोरोनाचा शिरकाव. 

तालुका कोरोणा मुक्तीचा आनंद ठरला क्षणभंगुर. 
खोडाळ्यात संचारबंदी लागू 
परिसरातील 36 क्वाॅरंटाईन
मोखाडा  (दीपक गायकवाड)  :  मोखाड्यात अखेरचे  7  कोरोणा बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले त्यामुळे मोखाडा तालुका कोरोणा मुक्त झाल्याचा आनंद सर्वच स्तरातून.व्यक्त केला गेला. मात्र, दुसर्याच दिवशी  15  जुलै ला तालुक्यातील खोडाळा गावांतील भवानीनगर मध्ये  60  वर्षीय महिला कोरोणा बाधित आढळली आहे. त्यामुळे मोखाडा कोरोणा मुक्तीचा आनंद क्षणभंगुर ठरला आहे.
               खोडाळ्यातील भवानीनगर मध्ये कोरोणा बाधित महिला आढळल्याने तो भाग प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केला आहे. तर कोरोणा चा संसर्ग रोखण्यासाठी खोडाळ्यात  14  दिवस संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी दिली आहे. तर बाधीत रूग्णांच्या संपर्कातील सुमारे  36  जणांना कोरोंटाईन करण्यात आले असुन ही संख्या वाढण्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ किशोर देसले यांनी दिली आहे.
काल तारखे अखेर खोडाळा पंचक्रोशीत कुठेही कोरोनाचा मागमूस नव्हता. मात्र परिसरासाठी महत्वाची बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथेच कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच सुरु असलेली एकमेव बाजारपेठही बंद होण्याच्या मार्गावर  असल्याने जनतेला प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!