ठाणे

कोरोनावर मात केलेल्या युवा पत्रकाराचे गावकऱ्यांकडून जंगी स्वागत

कल्याण दि.19 जुलै : कल्याणच्या मलंगगड परिसरात एका पत्रकाराला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे स्वत: दुचाकी चालवत त्याने हॉस्पिटल गाठलं होतं. शनिवारी कोरोनावर मात करुन आल्यानंतर या पत्रकाराचं गावात जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

मलंगगड पट्ट्यातील ढोके गावातील पत्रकार शुभम साळुंके याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. शहरात वेळेत रुग्णवाहिका मिळत नसल्याचे रोज दिसून येत होते. तोच प्रकार ग्रामीण भागात सुद्धा दिसून आला. कोरोनाची लक्षण जाणवायला लागल्यामुळे शुभम साळुंके याने रुग्णवाहिका मिळत नसल्याने स्वतः दुचाकी चालवत डोंबिवलीमधील आर. आर. हॉस्पिटल गाठलं. शुभम पत्रकारितेचं शिक्षण घेत असतानाच पुढारी वृत्तपत्रात काम करून स्वतःचं घर सुद्धा चालवतो. शुभमच्या घरची परिस्थिती बेताची आहे. वडील नाहीत. स्वतःचे शिक्षण, भावाचे शिक्षण करत तो घर सुध्दा चालवतो. त्यात कोरोनाची लागण झाली. मग उपचारांसाठी पैसे आणणार कुठून? असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. अखेर काही मित्रांच्या मदतीमुळे डोंबिवलीच्या आर. आर. हॉस्पिटलमध्ये शुभमला दाखल करण्यात आलं. ७ दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षणं न आढळल्यामुळे शुभमला डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर स्वतः पुन्हा आपल्या दुचाकीने डोंबिवली ते ढोके असा प्रवास करत त्याने घर गाठलं. विशेष म्हणजे कोरोनावर मात करत घरी आल्यावर संपूर्ण गावाने  शुभमचं जंगी स्वागत केलं. गावात फटाके फोडत दिवे लावण्यात आले. आणि हार तुऱ्यांनी शुभमचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!