ठाणे

दिव्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य शिबिर..

 दिवा : दिवा विकास प्रतिष्ठान व तन्वी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दिव्यात मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी शिबिराला दिवेकरणाचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला एकूण १७० जणांनी शिबिरात भाग घेतला.

नगरसेवक श्री.शैलेश पाटील आणि तन्वी फाउंडेशन अध्यक्षा सौ.ज्योती राजकांत पाटील यांच्या सहकार्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता covid-19 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना त्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन या मेडिकल कॅम्पमध्ये दिवेकर  नागरिकांसाठी रक्तदाब, मधुमेह, ताप,  सर्दी खोकला  या विविध आजारावर तपासणी करण्यात आली.

प्रसंगी दिवा विकास प्रतिस्थान व तन्वी फाऊंडेशनचे सभासद उपस्थित होते तर शिबिराला श्री क्लिनिकचे  डॉ. मुकुंद त्रिपाठी यांचं  मोलाचं सहकार्य लाभले. तसेच छाया जाधव,  नम्रता राणे, सुभाष गजरे सवीता घाटवल-पवार, प्रवीण उतेकर, निलेश पाटणे व संभाजी जाधव हे आवर्जून उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!