ठाणे

कल्याण-डोंबिवलीत बेड, व्हेंटिलेटर किती आणि  कुठं उपलब्ध आहेत ही माहिती जनतेला द्या..

सामाजिक कार्यकर्त्या वंदना सोनावणे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.रुग्ण जास्त आणि कोविड-१९ ची रुग्णालये कमी, त्यात भरमसाठ बिलाची रक्कम यामुळे रुग्ण पुरते हैराण झाले आहे. तर बेड, व्हेंटिलेटर किती आणि कुठं आहे याची माहिती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळत नसल्याने त्यांना मानसिक त्रासला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत बेड, व्हेंटिलेटर किती आणि  कुठं उपलब्ध आहेत ही माहिती जनतेला द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या वंदना सोनावणे यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत प्रत्येक दिवशी ४०० पेक्षा जास्त कोरीनाची लागण झालेले रुग्ण तपासणीत आढळून येत आहे.मात्र प्रशासनाची आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याने सर्व रुग्णांवर वेळेवर उपचार करणे शक्य होत नाही.कल्याण-डोंबिवलीत हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी कोविड-१९ ची रुग्णालये आहेत.पालिका रुग्णालयात बेड आणि व्हेंटिलेटरची मर्यादित सुविधा असल्याने सर्व रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात उपचार मिळणे शकत होत नाही. अश्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना कोविड-१९ रुग्णालयात बेड आणि व्हेंटिलेटसाठी माहिती घ्यावी लागते.

या कालावधीत रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता असते. कारण रुग्णावर वेळेवर उपचार होणे आवश्यक असते.वास्तविक सरकारने प्रत्येक पालिका प्रशासनाला त्याच्या हद्दीतील अश्या रुग्णांसाठी पालिका रुग्णालये आणि कोविड-१९ च्या रुग्णालयात किती बेड आणि व्हेंटिलेटर आहेत, सद्या स्थितीत बेड आणि व्हेंटिलेटर रिकामे आहेत,उपचारासाठी किती खर्च होऊ शकतो याची माहिती दररोज रुग्णालयाच्या बाहेर दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहेत असे निर्देश देणे आवश्यक आहे. पंरतु तसे निर्देश अद्याप आले असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. याचा गांभीर्याने विचार करत सामाजिक कार्यकर्त्या वंदना सोनावणे यांनी पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे कल्याण-डोंबिवलीत बेड, व्हेंटिलेटर किती आणि  कुठं उपलब्ध आहेत ही माहिती जनतेला द्या अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तसेच दारो-दारी, थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिमिटर चेक अपबाबत सोनावणे यांनी जर त्यांना रजिस्टर्ड करून, आयडी दिलं नसेल व अशी मंडळी नागरिकांमध्ये वावरत असेल, व उद्या कुठं काही गैर घडलं किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला तर आला जवाबदार व्यक्तीसाठी योग्य तो गुन्हा दाखल करण्याची तरदूद ही केली असावी असे म्हंटले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!