गुन्हे वृत्त

पॉपी स्ट्रॉ नामक अंमली पदार्थाची विक्री करणारया तरुणाला अटक, 8 किलो पॉपी स्ट्रॉ अंमली पदार्थ जप्त, अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाची कामगीरी

नवी मुंबई (वार्ताहर) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 मधील अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने पॉपी स्ट्रॉ नामक अंमली पदार्थाची विक्रि करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुनिल बलवंता राम बिश्नोई (28) या तरुणाला कोपरी भागातून अटक केली आहे. या कारवाईत विशेष पथकाने सुनिल बिश्नोई याच्या घरातून सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीचा 8 किलो वजनाचा पॉपी स्ट्रॉ हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. पॉपी स्ट्रॉ हा अंमली पदार्थ पकडण्याची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ही पहिलीच कारवाई आहे.
परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या अधिपत्याखालील अंमली पदार्थ विरोधी विशेष पथक पेट्रोलिंग करत असताना, एपीएमसीतील कोपरी गावात एक तरुण अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने गुरुवारी कोपरी गावात सापळा लाऊन सुनिल बिश्नोई याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्याजवळ फ्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये 0.312 ग्रॅम वजनाचा पॉपी स्ट्रॉ नावाचा अंमली पदार्थ आढळुन आला. त्यामुळे पोलिसांनी कोपरी गावातील त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये एका फ्लॅस्टिकच्या गोणीमध्ये सुमारे 7 किलो 690 ग्रॅम पॉपी  स्ट्रॉ हे अंमली पदार्थ आढळुन आले. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने आरोपी सुनिल बिश्नोई याच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. सदरचा अंमली पदार्थ त्याने कुठून आणला? याबाबत पोलीसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

पॉपी स्ट्रॉ या अंमली पदार्थाची शेती अफगणीस्थान भागात मोठया प्रमाणात केली जात असुन राजस्थान मार्गे हे अंमली पदार्थ भारतात तस्करी करुन आणले जाते. चूर्ण स्वरुपात असलेल्या या अंमली पदार्थांचे सेवन नाकावाटे अथवा तोंटावाटे केले जाते. या अंमली पदार्थांचे राजस्थान, मध्यप्रदेश व युपी भागातील लोकांकडून मोठÎा प्रमाणात सेवन केले जात असून हे अंमली पदार्थ सुमारे 40 हजार रुपये किलो प्रमाणे विकले जात असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!