महाराष्ट्र

मोखाडा तालुक्यातील जनावरांचे आरोग्य रामभरोसे 

20  पैकी 14 पदे रिक्त ; 2 डॉक्टर हाकतात गाडा
मोखाडा (दीपक गायकवाड) :  मोखाडा तालुक्यातील एकूणच आरोग्य सेवे पाठोपाठ जनावरांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे. मोखाडा तालुका पशुधन विभागात 20 मंजूर पदांपैकी केवळ 6 च पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत तर तब्बल 14 पदांचा भलामोठा अनुशेष आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जात सेवा द्यावी लागत आहे.
प्रस्तुत पदे तातडीने भरुन मोखाडा तालुक्यातील अनुशेष भरुन पशुधन सेवा पूर्ववत करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या कुसुम झोले यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर यांचेकडे केली आहे .
तालुका पशुधन विभागात पशुधन विकास अधिकारी 4 मंजूर पदांपैकी एकही पद भरलेले नाही. पशुधन पर्यवेक्षक 4 पैकी 2 कार्यरत आहेत. तर व्रणोपचारक 3 पैकी  1 रिक्त आहे. विशेष बाब म्हणजे शिपायांची 8 पैकी 7 पदे रिक्त असून 1 च ठिकाणी शिपाई उपलब्ध असल्याने डॉक्टरांनाच शिपायाची कामे करावी लागत असल्याचे विषम चित्र आहे.
दस्तूरखुद्द मोखाडा पंचायत समितीकडेच पशुधन विस्तार अधिकारी पद व खोडाळा येथील पशुधन विकास अधिकारी पद हे आयात तत्वावर कार्यरत असून प्रस्तुत अधिकारी हे मुळ पदावरील सेवा पुर्णपणे बजावल्या शिवाय मोखाड्याकडे लक्ष देत नसल्याने मोखाडा तालुक्यातील जनावरांचे आरोग्य हे रामभरोसे झाले आहे.
मोखाडा तालुक्यात 59 महसुली गावे आणि  222 पाडे असून लोकसंख्येच्या प्रमाणात जित्राबांची संख्या असून प्रत्यक्ष खेड्यापाड्यावर काम करण्यासाठी केवळ 2 पर्यवेक्षक असल्याने एव्हढ्या विस्तारीत क्षेत्रात काम करतांना जनतेच्या रोषाला सामोरे जात सेवा द्यावी लागत असल्याने तातडीने येथील अनुशेष भरण्याची मागणी झोले यांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!