ठाणे

२९  जुलै पासून विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरींचे  आमरण उपोषण.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचा जीव वाचवावा व तात्काळ वटहुकूम काढावा : मंजिरी धुरी.

डोंबिवली : पदवी व पदव्युत्तर मुलांच्या परीक्षेच्या सक्तीच्या विरोधात विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी ह्या २९ जुलै पासून आमरण उपोषणास बसणार आहे. धुरी यांनी गेल्या १६  जुलैला आमरण उपोषण सुरू केले असताना राज्यमंत्री तनपुरे व खासदारसुप्रिया सुळे यांच्या आश्वासनामुळे ह्या मागण्या पूर्ण होण्या करता १० दिवसांची मुदत  देत उपोषणाला स्थगिती दिली होती.

पंतप्रधान मोदी मुलांना करोना च्या महामारीत जे गिनींपिंग केले जात आहे हे आपणास मान्य आहे का ? असा रोखठोक सवाल विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केला असून विद्यार्थ्याना वाचवा असा टाहो फोडत पुन्हा एकदा २९ जुलै पासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे.   पुढे त्यांनी सांगितले की, उद्या परीक्षा जाहीर झाल्या तर त्याचा परिणाम अनेक मुलांच्या मानसिक अवस्थेवर होणार असून , अनेक मुली मुले आपले करियर संपले या भयातुन आयमहत्या करण्याच्या वाटेवर आहे.

पंतप्रधान मोदींना  विनंती केली असून जो पर्यंत वटहुकूम काढणार नाहीत तो पर्यंत आमरण  उपोषण चालू राहनार याची माहिती विद्यार्थी भारतीच्या राज्यस्तरीय बैठकी नंतर दिली गेली आहे.याच संदर्भात धुरी यांनी गेल्या १६  जुलैला आमरण उपोषण सुरू केले असताना राज्यमंत्री तनपुरे व खासदारसुप्रिया सुळे यांच्या आश्वासनामुळे ह्या मागण्या पूर्ण होण्या करता १० दिवसांची मुदत  देत उपोषणाला स्थगिती दिली होती. हे उपोषण १ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.  विद्यार्थ्यांची वाढती घुटमळ सहन करण्याजोगे नाहीच.म्हणून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या लढ्याला पूर्णविराम नसल्याचे धुरी यांनी सांगितले आहे. सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास केले पाहिजे,एटीकेटी आणि बँकलॉगच्या सर्व विद्यार्थ्यांना केले पाहिजे, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली पाहिजे, कोरोनाच्या काळात कोणत्याही प्रकारची फी घेऊ नये, कोणत्याही प्रकारच्या लेक्चरचे व सबमिशनची सक्ती नसावी भूषण पटवर्धन  यांनी राजीनामा द्यावा अश्या प्रमुख मागण्या आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!