ठाणे

एप्रिल ते जुलै 2020 चा मालमत्ता कर माफ करावा भाजपा प्रदेश सचिव संदीप लेले यांच आयुक्तांना निवेदन.

ठाणे,( ता २९ जुलै, संतोष पडवळ )ठाणे महापालिकेने एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीचा मालमत्ता कर पूर्णतः माफ करावा  तसेच पुढील परिस्थितीचा सापेक्ष विचार करुन मालमत्ताकराची आकारणी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव,नगरसेवक संदीप लेले यांनी केली आहे. लेले यांनी याबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे
२२ मार्च २०२० पासून देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणुन सर्व लहान मोठी अस्थापना, कार्यालये, व्यवसाय तसेच उद्योग हे गेले चार महिने पूर्णपणे ठप्प आहेत.२०२०.२१ या आर्थिक वर्षात आजतागायत अनेक व्यवसाय बंद आहेत व त्यांची कोणतीहीआर्थिक उलाढाल झालेली नाही, तसेच हि परिस्थिती अजुन किती काळ राहील याची कोणतीही शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. या अनुषंगाने या सर्वाना सरसकट मालमत्ता कर आकारणे योग्य होणार नाही.
२०१९-२० या आर्थिक वर्षात व्यवसाय चालू असल्यामुळे प्रत्येक घटकाने आपला मालमत्ता कर भरलेला आहे.तरी वरील सर्व बाबींचा विचार करुन एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीचा मालमत्ता कर पुर्णपणे माफ करण्यात यावा तसेच पुढील परिस्थितीचा सापेक्ष विचार करुन मालमत्ताकराची आकारणी करण्यात यावी अशी मागणी  भाजपा प्रदेश सचिव, नगरसेवक संदीप लेले यांनी निवेदनाद्वारे ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!