ठाणे

डोंबिवलीतील जनगणमन विद्यामंदिरातील आर्यन तांबडे ला दहावीच्या परीक्षेत ९० % गुण

डोंबिवली ( शंकर जाधव )  : मुंबई बोर्डात दहावीच्या परीक्षेत आर्यन मानसी प्रदीप तांबडेला  ९० % गुण मिळाले आहेत.त्याच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी त्याच काइतुक केलं असून त्याच्या कुटुंबाचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. आर्यन हा डोंबिवली (पश्चिम)येथील जनगणमन विद्यामंदिर ह्या शाळेचा विद्यार्थी असून लहानपणापासून तो हुशार आहे. त्याने आपल्या यशाचं श्रेय  त्याच्या शाळेतील मुख्याध्यापक राजकुमार कोल्हे सर तसेच शिक्षक ममता राय मॅम व आपल्या आईवडिलांना दिले आहे.त्याला पुढे कॉम्पुटर सायन्स घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले . त्याला मिळालेल्या यशाबद्दल तांबडे भावकी परिवाराने त्याचे विशेष अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!