ठाणे

डोंबिवलीत इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या.!

डोंबिवली  :  डोंबिवली पूर्व खोणी पलावा येथील एका इमारतीत राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेने १७व्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून या महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भूमी आझाद असे या विवाहितेचे नाव असून गेल्या काही महिन्यापासून ती डोंबिवली पूर्व खोणी पलावा सिटी येथील एंट्रीयाना या इमारतीच्या १७व्या मजल्यावर वास्तव्यास होती. मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एंट्रीयाना या इमारतीच्या खाली काही तरी पडण्याचा जोराचा आवाज होताच तेथील वॉचमनने इमारतीजवळ धाव घेतली. एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे कळताच त्याने इमारतीच्या इतर रहिवाशांना कळवले. या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने महिलेला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पण त्यानंतर डॉक्टरांनी तपासून या महिलेला मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वॉचमनकडे चौकशी केली असता ही महिला मागील काही महिन्यापासून १७ व्या मजल्यावर पती आणि मुलासह भाडेतत्वार राहत होती. मात्र महिन्याभरापासून तिचा पती मुलाला घेऊन तिला सोडून गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिच्या घराचे झडती घेतली असता त्यांना मिळून आलेल्या आधारकार्ड मध्ये तिचे नाव भूमी आझाद असल्याचे पोलिसांना कळले. मात्र आधारकार्ड वरील पत्ता चुकीचा असल्यामुळे ती यापूर्वी कुठे राहत होती?, तसेच तिचा पती कोण आहे? याबाबत काहीही कळू शकलेले नाही. मानपाडा पोलिसांनी या विवाहितेचा मृतदेह पूर्वतपासणीसाठी रुख्मिणीबाई रुग्णालय येथे पाठवला असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यू नोंद घेण्यात आलेली आहे. सध्या ती राहत असलेल्या घरमालकाशी पोलीस संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!