गुन्हे वृत्त

एफडीए कडून करोना इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कारवाई .

मुंबई  :  कोविड-१९ साठी वापर होणारी औषधांची मागणी व उपलब्धता यातील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या नियमित पणे अन्न व औषध प्रशासनास मिळत आहेत व त्या नुसार अश्या व्यक्ती विरुद्ध कारवाईची मोहीम प्रशासन घेत आहे.
#Tocilizumab_injection या औषधाची जास्त दराने विक्री करण्यासाठी दिल्ली येऊन एक इसम मुंबई येथे आला असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. त्या अनुषंगे दि.०३.०८.२०२० रोजी अन्न  व औषध प्रशासनाच्या निरीक्षकांनी बांद्रा पोलीसा समवेत बांद्रा रेक्लमेशन, बांद्रा  पश्चिम येते सापळा रचून, आझम नसीर खान रा. काशीपुर, उधमसिंगनगर,उत्तराखंड यास सिपला कंपनी चे टोसीलीझुमँब  (अक्टरमा ४००, इंजे.) ज्याची छापील किंमत रु ४०,५४५ आहे, सदर इंजेक्शन रु  १ लाख विना प्रिस्क्रिप्शन , विना परवाना विक्री करताना रंगेहाथ पकडले. सदर व्यक्तीने या औषधाची एकूण १५ इंजेक्शन ची खरेदी दिल्ली येतून विना बिलाने केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले. सदर व्यक्तीस  १५ इंजेक्शन सह ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी श्री संजय राठोड, औषध निरीक्षक बृहन्मुंबई यांनी संबंधितां विरुद्ध भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत बांद्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविला असून पुढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई डॉ.राजेंद्र शिंगणे, मा.मंत्री, अन्न व औषध प्रशासन,  श्री राजेंद्र यड्रावकर, मा.राज्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन यांनी या  औषधांचा काळाबाजार व अवाजवी किमतीत विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनांच्या अनुषंगाने श्री अरुण उन्हाळे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन,  श्री सुनील भारद्वाज, सहआयुक्त दक्षता, श्री गहाणे, सह आयुक्त बृहनमुंबई विभाग, श्री मंत्री सह आयुक्त मुख्य कार्यालय, सहाय्यक आयुक्त डॉ. तिरपुडे, सहाय्यक आयुक्त गुप्तवार्ता श्री रोकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासनाच्या बृहनमुंबई विभागाचे औषध निरीक्षक व बांद्रा पोलीस यांनी संयुक्तपणे केली. या कारवाईत औषध निरीक्षक सर्वश्री संजय राठोड, शरदचंद्र नांदेकर व श्री महेश देसाई वपोनि, आशा कोरके पोनि, श्री सुधीर जाधव सपोनि व पोलीस कर्मचार्यांशनी भाग घेतला।
रुग्णास छापील दरापेक्षा जास्त दराने औषधे विक्री होत असल्यास व औषधाचा काळा बाजार होत असल्यास या बाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 365 / ०२२- २६५९२३६२ या वर संपर्क साधावा असे आवाहन सह आयुक्त दक्षता श्री सुनील भारद्वाज यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!