मुंबई

मुंबईत हायअलर्ट! 9 तासांतच 229 मिमी पाऊस, 26 जुलैची आठवण करुन देणारी स्थिती

मुंबई  : मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि शहरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील तीन तासात मुसळधार अति मुसळधार पाऊस पडेल. ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे 26 जुलैची आठवण करून देणारी स्थिती निर्माण होते की अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोलाबा वेधशाळेनं दिलेली माहिती अशी की, गेल्या 9 तासांत 229.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!