ठाणे

कल्याणमध्ये आढळला दुतोंड असलेला दुर्मिळ घोणस साप…

कल्याण:- कल्याण शहर हे जैवविविधतेने परिपूर्ण आहे. कोरोना सारखी महामारी व अतिवृष्टीमुळे मनुष्यवस्ती मध्ये साप निघत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे अशा परिस्थितीतही सोशल डिस्टन चे नियम पाळून वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशन ही संस्था व सर्पमित्र हे वन्यजीवांच्या संरक्षण, संवर्धन आणि जनजागृती साठी कार्य करत आहे.

कल्याण च्या गंधारे परिसरात राहणा-र्या डिंपल शहा यांच्या ऋतु रिव्हर्स बिल्डींग च्या गेटजवळ सापाचे पिल्लू आढळून आले त्यांनी तात्काळ वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशन च्या टिम ला संपर्क केला असता सर्पमित्र निलेश नवसरे व सर्पमित्र प्रेम आहेर यांनी घटनास्थळी जाऊन त्या सापाचा सुखरूप बचाव केला असता ती दोन तोंड असलेली दुर्मिळ घोणस असल्याचे निदर्शनास आले…

यापूर्वी २० सप्टेंबर २०१९ रोजी गंधारे परिसरात दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशन च्या टिम ने बचाव केल्याची नोंद वनविभागाकडे आहे. त्यावेळी त्या सापाला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई येथे संशोधन कार्यासाठी ताब्यात दिले होते परंतू संशोधन सुरू असताना सदर सापाचा मृत्यू झाला होता. त्याच परिसरात दुस-र्यांदा हा दोन तोंडचा घोणस सापाला जिवदान देण्यात सर्पमित्रांना यश मिळाल्याचे वाॅर रेस्क्यू टिम चे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी माहित दिली

गतवर्षी हाफकिन संस्थेचे संशोधन कार्य अपूर्ण राहिले होते दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस सापाचा शास्त्रीय अभ्यास व नव्याने नोंद करून वनविभागाचे उप वनसंरक्षक श्री जितेंद्र रामगावकर साहेब व वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती वाघेरे यांच्या आदेश येईपर्यंत यांचा संभाळ करणार आहे तसेच वरील दोन्ही दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस साप एकाच परिसरात आढळल्याने त्या जागेबद्दल कुतुहल निर्माण झाले आहोत या घटनेची जागतीक स्तरावर नोंद करून सरिसृप संशोधन पपत्र ( Reptiles Rescerch Paper) जाहीर करणार असल्याचे वन्यजीव अभ्यासक व वाॅर रेस्क्यू टिम चे सचिव सुहास पवार यांनी सांगितले.
यावेळी विशाल कंथारिया, स्वप्निल कांबळे, निखिल कांबळे, हितेश करंजगावकर, उपस्थित होते

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!