ठाणे

 डोंबिवलीत शिवसेनेने केला येडियुरप्पा सरकारचा निषेध…

डोंबिवली ( शंकर जाधव ) : आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांचा बेळगांव जिल्ह्यातील मनगती या शहरात कायदेशीर परवानगी घेउन उभारलेला पुतळा हलवीण्याचं येडियुरप्पा यांच्या कर्नाटक सरकारने केलं आहे. त्याचा सर्व शिवप्रेमी तिव्र शब्दात निषेध करत आहे.डोंबिवलीत शिवसेना विभाग प्रमुख अमोल पाटील यासह अनेक शिवसैनिकांनी यांनी निषेध केला.यावेळी शाखा प्रमुख संजय मांजरेकर, शाखा प्रमुख आमोद वैद्य, महिला उपविभाग संघटक नंदिनी पोळ, शाखा संघटक साधना माळवी, युवासेना व इतर पदाधिकारी उपस्थित होते.येडियुरप्पा हे महाराज द्वेष्टी आहेत, मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराज व मराठेशाहीचा इतिहास हा शिवरायांच्या गौरवशाली पराक्रमाचा धडाच  पाठ्यपुस्तकातून या आदिलशाहीच्या पिलावळीनी काढून टाकला होता यावरून हे सिध्दच होतं.आम्ही शिवभक्त आमचा संताप व्यक्त करीत आहोत आणी पुन्हा एकदा महाराजांचा पुतळा सन्मानाने तीथे पुन्हा पुनरस्थापित करावा आणी महाराजांचा धडाही पुन्हा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा अशी मागणी करीत आहोत असे अमोल पाटील यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!