महाराष्ट्र मुंबई

मंत्री शंकरराव गडाख यांचा मुख्यमंत्री यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश.

मुंबई :  जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी (दि 11ऑगस्ट ) रोजी मातोश्रीवर शिव बंधन बांधले असून त्यांचा अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे. शंकरराव गडाख नेवासा विधानसभा मतदार संघात अपक्ष म्हणून ते निवडून आले होते. माझ्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या असलेल्या विश्वासामुळे शेतकऱ्यांचे तसेच विविध प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू शकेल असे यानिमित्ताने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले. यावेळी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते .
नगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघात शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची शंकरराव गडाख यांच्यासमवेत अनेक वर्षांपासून मैत्री असल्याने विधानसभेत गडाख अपक्ष निवडून येताच नार्वेकर यांनी गडाखांना सेनेत येण्यासाठी आग्रह धरला होता. सेना सतेत असो वा नसो मी तुमच्याबरोबर राहील असा ठाम शब्द गडाखांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी खासदार यशवंतराव गडाख यांचेही अत्यंत सलोख्याचे संबंध होते. दुसऱ्या पिढीतील दोन्ही कुटुंबातील सदस्य आता शिव बंधनात बांधले गेले आहेत .
नगर जिल्ह्यातील गडाख कुटुंब हे राजकारणातील मात्ताबर नेते आहेत. नगर शहरातील सेनेचे माजी मंत्री व उपनेते अनिल राठोड यांचे मागील आठवड्यात निधन झाले आहे, त्यामुळे जिल्ह्यात शिव सेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे नामदार गडाख यांच्यामुळे जिल्ह्यात शिव सेना वाढीला मोठी मदत होणार आहे .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!