ठाणे

मोठा गाव – मोणकोली पूल १५ महिन्यात पूर्ण होणार – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण – डोंबिवली येथून ठाणे शहरात प्रवास करणे सुकर व्हावे यासाठी मोठा गाव ते भिवंडीतील माणकोली पर्यंतच्या महत्वकांक्षी पुलाच्या कामाची पाहणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , यांनी मंगळवारी दुपारी केली. यावेळी येत्या १५ महिन्यात हा पुल तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र कोरोनामुळे गावी गेलेल्या कामगारांमुळे सध्या कामगारांचा तुटवडा असून ऑक्टोबर पर्यंत पुन्हा काम सुरू होणे कठीण असल्याची चर्चा अधिकारी आणि खासदारांमध्ये झाली.

 या पुलाच्या कामाला एमएमआरडीएने २०१३ मध्ये मंजुरी दिली होती. मात्र हा पुलाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी जमिन हस्तांतरीत करणे सुरू केल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला होता. भिवंडी येथील माणकोली पुलाखाली राहणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रामाणात यासाठी विरोध केला होता. त्यानंतर एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी येथील नागरीकांसोबत चर्चा करून सद्यास्थितीत ८० टक्के जमिन हस्तांतरीत केली असल्याची माहिती या पाहणी दौऱ्या दरम्यान एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी दिली. मात्र कोरोनामुळे सध्या काम बंद असून साधारण ऑक्टोबर महिन्यापर्यंत कामगार मिळतील आणि काम सुरू होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मुळातच बराच वर्ष रखडलेल्या या पुलाचे काम पूर्ण होणार की नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती.

पंरतु आजच्या पाहणी दौऱ्या दरम्यान या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच खाडीकिनारी देखील दोन खांब टाकले असल्याची माहिती खासदारांनी दिली. त्याच बरोबर डोंबिवली पश्चिम येथील वाहतुक कोंडी वाढू नये यासाठी पुलाला जोडणाºया रिंग रूटचे काम देखील सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हा पुल १२२५ मीटर लांबीचा असून यासाठी दोन गर्डर बसवावे लागणार असल्याचे सांगतानाच एकीकडे गर्डर बनविण्याचे काम देखील सुरू करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. यावेळी कल्याण – डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी – देवनपल्ली, महापौर विनिता राणे, स़्थायी समितीचे माजी सभापती दिपेश म्हात्रे, नगरसेवक राजेश मोरे, विश्वनाथ राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!