ठाणे मुंबई

गणेशोत्सवासाठी  कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी टोल माफ

मुंबई, ( ता १३, संतोष पडवळ ) – गणेशोत्सवासाठी दरवर्षी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा हा प्रवास सुरळीत होण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आता कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी टोल माफ करण्यात आला आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस चाकरमान्यांना टोलमधून सवलत मिळणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलीस स्थानकात संपर्क साधावा, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आयसीएमआरच्या निर्णयानुसार, स्थलांतरितांना नव्या ठिकाणी किमान १४ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!