मुंबई

७४ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात साजरा…

राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण…
मुंबई कार्यालयात खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण…
मुंबई दि. १५ अॉगस्ट – भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,
सेवादल प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, चिटणीस संजय बोरगे, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण, मुंबई विभागीय विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले,जिल्हाध्यक्ष विजय वाडकर आदींसह पक्षाचे मुंबई व प्रदेशचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हा दिवस झेंडावंदन पुरता मर्यादित नाही तर देशाचे भवितव्य घडविण्यासाठी, अखंड राखण्यासाठी बलिदान देणार्‍यांच्या आठवणी व बलिदान कायम स्मरणात रहावे म्हणून साजरा करतो असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
आजही देशात गरीबी, भेदभाव आणि आव्हानेही आहेत. सध्या कोरोनासारख्या महामारीचा आपण मुकाबला करत आहोत. यामुळे अनेक प्रश्न आणि आव्हाने पुढच्या काळात निर्माण होणार असल्याचेही खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले.
आपला पक्ष व आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. पवारसाहेबांचे पुरोगामी विचार देशाला गरजेचे वाटत आहे. हे विचारच घेऊन आपल्याला काम करायचे असल्याचे खासदार प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!