ठाणे

विसर्जनासाठी गणेशमूर्तींची नोंदणी ठाणे महापालिकेच्या वेबसाइटवर करा ; महापौर व महापालिका आयुक्तांचे ठाणेकरांना जाहीर आवाहन

ठाणे:– कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनसाठी भाविकांची होणारी गर्दी मर्यादीत करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेकरिता व कोरोना साथरोगाच्या नियंत्रणाकरिता महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी एकूण 13 कृत्रिम तलाव व 20 मूर्ती स्वीकृती केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रणासाठी महापालिकेने विसर्जन वेळेची नोंदणी (Time Slot Booking) महापालिकेच्या संकेतस्थळावर करण्यासाठी व्यवस्था केली आहे. तरी नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या वेबसाइटवर नोंदणी करावी असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के महापालिका आयुक्त डाँ. विपीन शर्मा यांनी केले आहे कृत्रिम तलाव व स्वीकृती केंद्राची नोंदणी महापालिकेच्या संकेतस्थळावर केल्यानंतर नोंदणी केलेल्या मूर्तींचेच विसर्जन त्या त्या ठिकाणी होईल. प्रत्येक कृत्रिम तलाव व मूर्ती स्वीकृती केंद्रांचे Time Slot दररोज नव्याने उपलब्ध करुन देण्यात येत असून गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवसापर्यंत नागरिकांना Time Slot बुक करता येणार आहे.डी.जी. ठाणे अॅकपवर विसर्जनासाठी नागरिक वेळ (Time Slot) आरक्षित करु शकतात. त्याकरिता https://covidthane.org/Visarjan/terms ही लिंक उपलब्ध आहे. ठाणे महानगरपालिकेने कोव्हीड – 19 साथरोगाचा प्रार्दुभाव नियंत्रणासाठी कृत्रिम तलाव व गणेशमूर्ती स्विकृती केंद्रे येथे विसर्जन आरती करावयास मनाई केलेली आहे. विसर्जन स्थळी प्रत्येक मूर्तीसोबत 3 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती नसाव्यात. आगावू विसर्जन वेळेची नोंदणी करणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र मार्गिका केलेली असून त्याचे पालन करावे. त्यासाठी Digi Thane यांनी दिलेला SMS किंवा प्रत सोबत असणे आवश्यक आहे. नोंदणी न केलेल्या आरक्षित नागरिकांसाठी वेगळी मार्गिका असून त्याचे पालन करावे. तसेच सोशल डिस्टन्सींग पालन करावे. मास्क न लावता विसर्जनस्थळी येवू नये. विसर्जन / मूर्ती स्विकृत केंद्राच्या ठिकाणी मूर्ती दिल्यानंतर कृपया नागरिकांनी तेथे थांबू नये व गर्दी करु नये. परिसरामध्ये सेल्फी काढू नये. कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन मूर्ती स्वीकृती केंद्रांवर गणेशाच्या मूर्ती दान कराव्यात व विसर्जन घाट आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळून महापालिकेस सहकार्य करावे. ठाणे महानगरपालिका, पोलिस प्रशासन व शासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. ‍विपिन शर्मा यांनी केले आहे. प्रभाग समिती निहाय मूर्तीदान केंद्र नौपाडा कोपरी प्रभाग समिती- • गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र – मासुंदा तलाव परिसर , मढवी हाऊस / राम मारुती रोड, कोपरी प्रभाग समिती कार्यालय • कृत्रिम तलाव – मासुंदा तलाव वागळे इस्टेट प्रभाग समिती – • गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र – मॉडेला चेकनाका , किसननगर बसस्टॉप • कृत्रिम तलाव – रायलादेवी तलाव नं. 1, रायलादेवी तलाव नं. 2 लोकमान्यनगर सावरकरनगर प्रभाग समिती – • गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र – कामगार हॉस्पिटल , लोकमान्यानगर बसस्टॉप – रोड नं. 22 वर्तकनगर प्रभाग समिती – • गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र – खेवरा सर्कल, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, पवार नगर बस स्टॉप, वर्तकनगर पोलीस स्टेशन, वर्तकनगर नाका • कृत्रिम तलाव – पालायदेवी मंदिर उपवन तलाव, निलकंठ ग्रीन्स, मुल्ला बाग माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती – • गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र – रिजन्सी हाईट्स, आझादनगर, ट्रॉपिकल लगुन समोर आनंदनगर, विजय नगरी अनेक्स, कासारवडवली • कृत्रिम तलाव – रेवाळे तलाव, हिरानंदानी, ब्रम्हांड विभाग उथळसर प्रभाग समिती- • गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र – जेल तलाव, चिरंजीवी हॉस्पिटल • कृत्रिम तलाव – घोसाळे तलाव कळवा प्रभाग समिती – • गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र – सह्याद्री शाळा (सहकार विद्यालय) • कृत्रिम तलाव – खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव मुंब्रा प्रभाग समिती • गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र – भारत गिअर्स दिवा प्रभाग समिती • गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र – दत्त मंदिर, शीळ, नॅशनल स्कूल / जिव्हाळा हॉल – दिवा • कृत्रिम तलाव – खिडकाळी तलाव, दातीवली तलाव.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!