ठाणे

खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर पालकमंत्री ना. शिंदे यांचे आदेश ; पालिकेची यंत्रणा रस्त्यावर.

ठाणे (ता 27, संतोष पडवळ ) : राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी खड्डे भरण्याबाबत दिलेल्या आदेशामुळे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली असून शहरातील खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
संततधार पावसामुळे शहरात विविध ठिकाणी खड्डे झाले आहेत. सदर खड्डे तातडीने भरण्याच्या सूचना महापौर नरेश नगणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी केल्या होत्या. त्यानुसार पावसाची उघडीप मिळताच महापालिकेच्यावतीने प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

सदरचे खड्डे हे कोल्डमिक्सचा वापर करून भरण्यात येत असून आज सकाळपासून वागळे प्रभाग समितीतंर्गत ॲपलॅब सर्कल आणि इतर ठिकाणी खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने प्रभाग समितीनिहाय खड्डे भरण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार खड्डे भरणीच्या कामासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे अशा सूचना नगर अभियंता रविंद्र खडताळे यांना दिल्या आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!