महाराष्ट्र

अथर्व थोरात कृषि पदवीधर संघटनेच्या जिल्हा युवक अध्यक्ष पदी.

पुणे  : कृषि पदवीधर संघटना ही राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर आणि शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी २०१२ साली कृषिभुषण महेश कडुस पाटील यांनी स्थापन केली असुन गेल्या दशकभरात पासून अनेक विद्यार्थी आंदोलने व जनजागृती आणि उपक्रमांच्या माध्यमातून सरकार कडे मागण्या मान्य करुन घेणारी ही संघटना आहे. नुकतीच कृषी विद्यार्थी यांच्या परीक्षा मुल्यांकन तत्वावर घेऊन पुढील वर्षाकरीता प्रवेश देण्याची मागणी शासनाकडे पाठपुरावा करुन कृषि पदवीधर संघटनेने मान्य करुन घेतली.

महेश कडूस पाटील यांच्या बाणेर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर अथर्व थोरात यांचे नाव पुणे जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून निश्चित करण्यात आले. या बैठकीत मूळ कार्यकारीणी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद दाभाडे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष गणेश कायगुडे, हवेली तालुका युवक अध्यक्ष जयेश भदाणे पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष तेजस घारे यांनी सर्वानुमते या निवडीसाठी अनुमोदन दिले. अशा संघटनेच्या माध्यमातून खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकर्यांना व त्यांच्या मुलांना संघटीत करण्यासाठी दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे अर्थव थोरात यांनी सांगितले. अथर्व थोरात यांचे शेतकरी व विद्यार्थी युवक सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!