ठाणे

राष्ट्रीय पल्सपोलिओ लसीकरण मोहिम 20 सप्टेंबरला.

ठाणे (02 सप्टेंबर, संतोष पडवळ ) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दि. 20 सप्टेंबर 2020 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे.

0 ते 5 वर्षापर्यतच्या सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे यासाठी राज्यात सन 1995 पासून उप राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम दरवर्षी राबविण्यात येते. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये सदर लसी मोफत उपलब्ध करण्यात आल्या असुन त्याचा लाभ पालकांनी 5 वर्षापर्यंच्या सर्व बालकांना द्यावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!