महाराष्ट्र

एस टी महामंडळाला डेपोतील भाडेकरू कडून लॉकडाऊनमुळे बारा कोटींचा फटका

मुंबई  : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून राज्यभरात एसटीची वाहतूक बंद होती. त्यामुळे एसटीला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. त्याचबरोबर राज्यभरातील एसटी महामंडळाच्या बसस्थानकांवर विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी एसटीकडून भाडेतत्वावर जागा दिली जाते. त्याचे भाडे मागील पाच महिन्यांपासून एसटीला मिळाले नसल्यामुळे जवळ जवळ १२ कोटी रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाला झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

एसटी महामंडळाचा राज्यभरात मोठा पसारा आहे. राज्यभरात एकूण ५६८ बस स्थानकांत प्रवाशांच्या सुविधेसाठी या बसस्थानकावर ज्यूस विक्रेता, कॅन्टीन चालक, रसवंती, पानटपरी, पेपर स्टॉल, पार्किंग असे अनेक व्यवसाय करण्यासाठी एसटी महामंडळ आपल्या बस स्थानकांतील जागा भाडेतत्वावर देते. त्यातून एसटीला प्रत्येक महिन्याला भाडे स्वरुपात महसूल सुद्धा मिळत असतो. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून राज्यभरातील एसटी महामंडळाचं चाक बंद होतं. त्यामुळे एसटी बस स्थानकावर असलेल्या दुकानांना सुद्धा टाळे असल्याने मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने सुद्धा लॉकडाउन काळात भाडेकरुंकडून जबरदस्ती भाडे न आकारण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे एसटी महामंडळाने सुद्धा भाडेतत्वावर दिलेल्या जागेचे भाडे मागितले नाही. मात्र आता एसटीचा आंतरजिल्हा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे आता महामंडळाकडून भाडे आकारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

महिन्याचे २ कोटी रुपये भाडे!

एसटी महामंडळाच्या ५६८ बस स्थानकांपैकी २५० एसटीचे आगार आहेत. या आगारात एसटीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात आस्थापने आहेत. प्रत्येक महिन्याला राज्यभरातून सरासरी २ कोटी रुपये भाड्यापोटी रक्कम महामंडळाला मिळत होती. मात्र २३ मार्चपासून गेल्या लॉकडाऊनमुळे ही रक्कम येणं बंद झालं आहे. गेल्या ६ महिन्यांचे भाडेकरुंकडून १२ कोटी रुपये येणे बाकी आहेत. त्यामुळे एसटी महामंडळ अजून आर्थिक अडचणीत आलं आहे.

एसटीच्या तोट्यात वाढ

२० ऑगस्टपासून तुरळक स्वरूपामध्ये राज्यभर एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. दररोज फक्त दीड कोटी इतके उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल बहुतांश थांबला आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त २२ प्रवाशांची वाहतूक करणं एसटीला आर्थिक अडचणीत आणणारं असून अर्ध्या प्रवाशांमुळे एसटीच्या तोट्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे एसटी आता महसूल गोळा करण्यावर भर देत आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!