ठाणे

कोविड सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळण्यात आले

भारतीय जनता पार्टीच्या मागणीला यश
 
*अंबरनाथ दि. ०२ (नवाज अब्दुलसत्तार वणू) :  अंबरनाथमधील सर्व खाजगी व सरकारी शाळांमधील शिक्षकांना अंबरनाथ नगरपालिकेतर्फे सक्तीच्या कोविड सर्वेक्षण ड्युटी लावल्या जात होत्या. यामध्ये बऱ्याच शिक्षकांना याचा त्रास होत होता. त्यातच काही जणांना कोविडची लागण देखील झाली. भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष शैलेन्द्र सपकाळ यांनी भाजपाचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले पाटील यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक व पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ “शिक्षकांच्या रास्त मागण्या” घेऊन अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची भेट घेतली.
या चर्चेदरम्यान लगेचच महिला शिक्षिका व पंचावन्न वर्षांवरील शिक्षकांना कोविड सर्वेमधून वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गंभीर आजार असणाऱ्या शिक्षकांना ही या सर्वेमधून वगळण्यात आले आहे. असे मुख्याधिकारी यांनी मान्य केले.  भाजपाच्या व शिक्षकांच्या रेट्यामुळे आज सर्व शिक्षकांना  covid-19 सर्वेक्षणाची ड्युटी न लावण्याचे आदेश काढण्यात आले आहे. शिष्टमंडळात संघटन सरचिटणीस दिलीप कणसे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष खानजी धल, विश्वास निंबाळकर ,राजेश सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!