गुन्हे वृत्त

नवी मुंबईत रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा पर्दाफाश, ३ जणांना अटक

नवी मुंबई- सर्वसामान्य गोरगरिबांना पुरवण्यात येणाऱ्या रेशनचा सर्वात मोठा काळा बाजार नवी मुंबई पोलिसांनी उघड केला आहे. कोविड काळात गरीब जनतेला पुरवण्यात येणारे रेशनचे तांदूळ थेट त्यांना न मिळता विविध साऊथ आफ्रिकन देशात निर्यात होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पनवेल शहर पोलिसांनी गेल्या महिन्यात पळस्पे येथील पलक रेशन गोदामावर छापा मारला होता. त्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवणूक करून ठेवण्यात आलेला तब्बल ३३ लाख रुपये किंमतीचा ११० टन तांदळाचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. त्यानंतर विशेष तपास पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून सार्वजनिक वितरणासाठी असलेला एकूण २७० मेट्रिक टन तांदूळ जप्त केला आहे.

हा तांदूळ कर्नाटकातील विविध सरकारी रेशन दुकानातून आणल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर, विशेष तपास पथकाने कर्नाटक राज्यात जाऊन तेथील ३ रेशन दुकानदारांना अटक केली आहे. नवनाथ लोकू राठोड (वय २५), सत्तार चांदसाहब सय्यद (वय २५) आणि कृष्णा दामो पवार (वय ४५) अशी दुकानदारांची नावे आहेत. हे तिघेही कर्नाटकातील विजापूर भागातील आहेत. त्यांनी गेल्या ८ महिन्यात ३२ हजार ८२७ मेट्रीक टन तांदूळ साऊथ आफ्रिकन देशात निर्यात केला असून त्याची किंमत ८० कोटीच्या घरात आहे.

या प्रकरणात आतापर्यत १८ आरोपींची नावे समोर आली आहेत. नवी मुंबई पोलिसांनी प्रथम पनवेल पळस्पे येथील टेक केअर लॉजिस्टिकमधून तांदूळ जप्त केला, त्यानंतर भिवंडीमधून जय आनंद फूड कंपनी मिरांडे इंडस्ट्री, खालापूर येथून झेनिथ इम्पाक्स कंपनी आणि जय फूड प्रोडक्शन कंपनीमधून तब्बल ९१ लाख १२ हजार ४६ रुपये किमतीचा तांदूळ जप्त केला आहे, असे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!