ठाणे

देसाई-आगासन खाडी उड्डाणपुलासंदर्भात मनसे आमदार, अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये संयुक्त बैठक…

मनसे आमदार राजू पाटील लवकरच घेणार ग्रामस्थांसोबत ठाणे मनपा आयुक्तांची भेट…
कल्याण ग्रामीण :  कल्याण ग्रामीण भागातील ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या शालू हॉटेल जवळून देसाई- आगासन  उड्डाणपुल मंजूर झाला. मात्र जुना आराखडा नामंजूर करत महापालिकेने नव्या आराखड्यानुसार उड्डाणपूलाचे काम करणार आहे. त्यामुळे या उड्डाणपूलाच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केल असून जुन्या आराखड्यानुसार काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खाडीवरून जाणार देसाई-आगासन उड्डाणपुलाच्या कामात भूमीपुत्रांची घरे,जमीन आणि वृक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हीच बाब ग्रामस्थांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या निर्दशनास आणून दिली.त्यानंतर लगेच त्यामुळे मनसे आमदार पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांची आगासन गावात संयुक्त बैठक घेतली.
कल्याण ग्रामीण भागात असलेल्या आगासन ग्रामस्थांनी देसाई – आगासन खाडी उड्डाणपुलाच्या कामाच्या आराखड्याला विरोध केला आहे. या उड्डाणपुलाच्या कामामध्ये सुमारे ५० पेक्षा अधिक घरं आणि २०० पेक्षा अधिक वृक्षांची तोड होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या उड्डाणपुलाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केला असून जुन्या आरखाड्यानुसार काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांनी सुचवलेल्या मार्गिके संदर्भात मनसे आमदार राजू पाटील हे देखील सकारात्मक असून असून लवकरच या संदर्भात ठाणे मनपा आयक्तांची भेट घेतली जाणार आहे. आगासन गावातील गणेश घाटावर ग्रामस्थ,ठाणे मनपाचे अधिकारी आणि आगासन गाव बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी ठाणे मनपा साहाय्यक आयुक्त महेश आहेर , उप अभियंता अनिल पाटील , आगासन गाव बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोहिदास मुंडे, दिवा मनसे शहराध्यक्ष तुषार पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!