ठाणे

मृत्यू २०  तारखेला आणि ७ तारखेचा मृत्यूदाखला.. पालिकेच्या भोंगळ कारभार…

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरीना काळात पालिकेच्या नियोजन शून्य कारभारावर विरोधी पक्षांनी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.पालिकेच्या आणखी एका भोंगळ कारभाराचे उदाहरण समोर आले आहे.कल्याण मधील एका व्यक्तीचा मृत्यू ७ जुलै रोजी झाला.मात्र पलिकेने त्यांच्या मृत्यूदाखल्यात २० जुलै ही तारीख नमूद केली.या निष्काळजीपणामुळे मृत व्यक्तीच्य कुटूंबियांना नाहक त्रास सहन करावा लागला.
   २० जुलै २०२० रोजी मृत पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला पालिका प्रशासनाने ७ जुलै २०२० अशी तारीख लिहून मृत्यूदाखला त्यांच्या कुटुंबियाना दिला.
कागदोपत्री सदर व्यक्ती १३ दिवस आधीच मृत झालेली दाखविण्यात आली. मृत्यू दाखला असो अथवा इतर दाखले असो ते मिळवण्यासाठी किती पायपीट करावी लागते हे माहितीच आहे. त्यात प्रशासनाने केलेला हा हलगर्जी पणा समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर म्हणाले, कोरोना काळात केलेल्या सर्व प्रकरणातील निष्काळजीपणाबद्दल मुख्य वैद्यकीय अधिकारी ह्यांना पाठीशी घालत आले आहेत. आणि सदर प्रकरणात ही त्यांना पाठीशी घालत आहेत. आता प्रशासन स्वतःहून दुरुस्त करून देतील ही पण झालेल्या मनस्तापच काय..? त्याची भरपाई कशी करणार..?

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!