ठाणे

योग विद्या धम तर्फे मोफत ऑनलाइन योग वर्गाचे आयोजन

वृत्त प्रतिनिधी : शंकर जाधव

दिनांक – १० सप्टेंबर २०२०


डोंबिवली :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग पाळणे, मास्क लावणे त्याच बरोबर अधिकाधिक कामे   ऑनलाईन
माध्यमातून  करण्याकडे नागरिकांचा कल आहे. मात्र याच काळात शररिक दृष्ट्या तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. त्यामुळे योग विद्याधाम यांच्या डोंबिवली शाखेतर्फे ऑनलाइन योगा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. १४ सप्टेंबर २०२० ते २० सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये षटचक्र ध्यानसाधना वर्गाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ऑनलाईन योग प्रशिक्षण अत्यंत वेगाने लोकप्रिय होत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे सोशल डिस्टनसिंग पाळणे सोपे जाते. याच बरोबर योगा शिकण्याचा अनुभवही घेता येतो. विशेष म्हणजे जाण्या येण्याचा वेळ वाचतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना सहभागी होता येणार आहे.. योग क्षेत्रातील भरीव कार्यासाठी  पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले    योगाचार्य,ऋषीधर्मज्योती. डॉ. श्री.विश्वासराव मंडलिक हे योग वर्गाचे   मार्गदर्शक  असणार  आहेत.
  हा वर्ग सकाळी ०६:३० ते ०८:०० या वेळात, झूम ऍप च्या माध्यमातून घेण्यात येईल. या योग शिक्षणामुळे  सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास , अनेक दुर्धर आजारातून मुक्तता आणि मेंदूची कार्यक्षमता व मनाची एकाग्रता वाढू शकते असा दावा योग विद्या धाम संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!