ठाणे

बोगस कोरोना डॉक्टरचा मनसेने केला पर्दाफाश…

कल्याण :  कल्याण खडक पाडा येथील साई लीला व कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील माउली हॉस्पिटल चालवणारा व स्वतःला डॉक्टर बोलणारा अमित साहू ह्या बोगस व फसव्या डॉक्टरचा पर्दाफाश आज मनसेने रुग्णाच्या नातेवाईकाच्या मदतीने केला.

कल्याण खडक पाडा येथील साई लीला ह्या डॉक्टर कुलकर्णी ह्यांच्या हॉस्पिटलला तात्पुरत्या स्वरूपात भाडेपट्टीवर चालवायला अमित साहू नावाच्या बोगस डॉक्टरने घेतले होते, लाखो रुपये भाडे मिळणार म्हणून ते भाडेपट्टीवर कुठलीही शहनिशा न करता चालवायला दिले सादर हॉस्पिटलला कोविड व नॉन कोविड रुग्णांवर उपचार हा बोगस डॉक्टर करत होता, जागेचे मालक डॉक्टर कुलकर्णींना जेव्हा संशय आला व भाडेपट्टीचा दिलेला धनादेश बाउंस झाला तसा त्याला जागा खाली करायला लावली, ह्या बोगस डॉक्टर अमित साहूने जे रुग्ण ऍडमिट होते त्यांना परस्पर रुग्णाच्या नातेवाईकांना न कळवता व खोटे कारण देत कल्याण पूर्व चिंचपाडा येथील माउली हॉस्पिटलला शिफ्ट केले जे अजून एक हॉस्पिटल तो चालवत होता व अजूनही भाड्यावर चालवतो, माउली ऑस्पिटल हे खाजगी व नॉन कोविड आहे तिथे सुद्धा त्याने कोविड रुग्ण ऍडमिट करून उपचार केल्याचे कळते, तीन दिवस संबंधित रुग्णाला उपचार केल्यावर व नातेवाईकांपासून रुग्णाला लांब ठेवल्यावर परत त्याने रुग्ण गंभीर आहे त्याला आई आरोग्यम ह्या आता तिसऱ्या हॉस्पिटलला वर्ग करावे लागेल असे सांगून ऍम्ब्युलन्स बोलावून तसे त्याने शिफ्टिंग सुरु केले पण नातेवाईकांनी रुग्णाची गंभीर अवस्था बघून त्याला आपल्या ताब्यात घेऊन डोंबिवलीच्या खाजगी हॉस्पिटलला ऍडमिट केले सध्या रुग्ण गंभीर स्थिती त असून जीवन मरणाच्या दारात आहे, हा बोगस अमित साहू नातेवाईकांना खोटे सांगायचं कि तो स्वतः डॉक्टर आहे व नातेवाईकांकडून सतत पैसे उकळायचा…शेवटी आज मनसे आमदार राजू पाटील ह्यांच्याकडे तक्रार केल्यावर मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, पदाधिकारी हरीश पाटील,योगेश गव्हाणे, सागर जेधे, अनंत गायकवाड, सचिन कस्तुर ह्यांनी माउली हॉस्पिटलला धडक दिली परंतु बोगस डॉक्टर साहू तेथून पळून गेला, पोलिसांचा प्रचंड फौज फाटा आधीच बंदोबस्ताला लागल्याने त्याला कुण कुण लागली असेल, पोलिसांनी त्याला फोन करून उद्या पोलीस स्टेशनमध्ये बोलावले आहे तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील ह्यांची भेट घेऊन अमित साहुला बोगस डॉक्टर जाहीर करून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली व तास अर्ज केला आहे,

महापालिकेने अशे भाड्याने चालवणारे व कॉरोनची भीती घालून दंड मांडणाऱ्या डॉक्टरांवर व बोगस डॉक्टरांवर भरारी पथकांमार्फत कारवाई करावी अशी विनंती केली

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!