ठाणे

ठाणे जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) पदी श्री अजिंक्य पवार यांची नियुक्ती

ठाणे दि. १८ सप्टेंबर : ठाणे जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) पदी श्री अजिंक्य पवार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते  उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं. ) , जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे कार्यरत होते. सन २००१ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांना  १६ वर्षाचा प्रशासनाचा अनुभव आहे.

 

श्री. पवार यांनी यापूर्वी  उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं. ) उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र . )जिल्हा परिषद बुलढाणा,    गट विकास अधिकारी , पंचायत समिती गेवराई, पंचायत समिती खेड , पंचायत समिती घनसांगवी, आदी पदांवर काम केले आहे.

 

प्रशासनात काम करताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचा वेळोवेळी सन्मान करण्यात आलेला आहे. यामध्ये Panchayat Enterprises Suit ( PES ) अंतर्गत PRIA Soft मध्ये शुभारंभ वर्षात उत्तम काम केल्याबद्दल शासनाने अभिनंदन व सत्कार केला .  PES साठी मास्टर ट्रेनर म्हणून MoPR व NIC दिल्ली च्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल वर्कशॉप 2012 मध्ये पंचमढी मध्यप्रदेश मध्ये राज्याचे प्रतिनिधीत्व केले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं ) म्हणून जिल्हा परिषद बुलढाणा येथे काम करत असतांना जि.प. उपकर दर व आठवडी बाजार दरांमध्ये वाढ करून जिल्हा परिषदेचे स्व – उत्पन्न वाढविले .

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!